ग्रामस्थांनी घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे

0

 

शिरूड ता अमळनेर (रजनीकांत पाटील)  ग्रामस्थांना,सरपंच व ग्रामसेवक यांना विनंती आहे की वर्षभरापासून  कोरोना कोवीङ 19  ह्या विषाणुने अहाकार चांगलाच माजवला आहे .आपल्या शिरूड सह तालुक्यात बरेच नागरिक  पाॅझीटीव रूग्ण आढळुन आले आहेत व काहींनी आपला जीव देखील गमावलं आहे तरी माझ्या मायबाप ग्रामस्थांना विनंती आहे.

की शासनाने लावलेल्या पंधरा दिवसाचे जनता कर्फ्यू  असून घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे तरी कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर शहरात किंवा गावात फिरु नये बाहेरगावच्या  येणाऱ्या मंडळींनी पासून लांब राहा  घरीबसल्या कोरोनाला आमंत्रण देऊ नका व आपल्या परिवारातील कोणालाही  बाहेरगांवी जाऊ देऊ नका कारण विषाणु आपल्यागावातही  चांगलाच वावरत आहे   ही गंभीर बाब सर्वांनी लक्षात घ्यावी . सर्व ग्रामस्थांनी घरातच थांबुन स्वयंम रक्षक बनुन गावाची रक्षा करावी व प्रशासनास मदत करावी  . आपण जिथे आहात तिथेच घरी थांबा नम्र विनंती घरीच रहा सुरक्षित रहा आपल्या गावात श्री  गुरु दत्त माऊली प्रभुची कृपा आहेस संयम ठेवा सर्व सुरळीत होईल

Leave A Reply

Your email address will not be published.