ग्रामसेवकाच्या दांडीला कंटाळून सरपंच,सदस्यांचा सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

0

बोदवड (प्रतिनिधी)- तालुक्यातील वरखेड खुर्द येथील सरपंच तथा सदस्य यांनी येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्यामुळे व वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवक बदलून न मिळाल्याने सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.

वरखेड खुर्द येथील ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री.राजहंस हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे गावपातळीवरील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.यासह शासनाकडून विविध विकास कामांसाठी आलेला निधी पडून आहे.तसेचं गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पट्टी,घरपट्टी वसुली भरणा करण्यात आलेला नाही.एकदंर येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्यामुळे व याबाबत तक्रार करुनही कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.येत्या २३ डिसेंबर पर्यंत ग्रामसेवक बदलून न मिळाल्यास येथील सरपंच व सदस्य यांनी सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा बोदवड पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी श्री.आर.ओं.वाघ यांची प्रतिक्रिया घेतली असता संबंधित ग्रामसेवक यांना याबाबत नोटीस बजावली आली असून येत्या दोन दिवसांत समस्या मार्गी लावू असे त्यांनी याबाबत ‘लोकशाही’शी बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.