एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल – तालुक्यात 37 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऐन थंडीत राजकीय वातावरण तापत आहे. 4 जानेवारी रोजी माघारीची अंतिम मुदत असल्याने आता माघार कोण घेणार व किती व कोणकोण उमेदवार रिंगणात राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
कासोदा, आडगाव, तळई, उत्राणगू.ह, उत्राण अ.ह, या प्रमुख व मोठ्या ग्रामपंचायती च्या निवडणुका होत असल्याने राजकीय दृष्ट्या या ग्रामपंचायत निवडणूक यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते निवडणूक जिंकण्यासाठी डावपेचांची आखणी करत आहे.