भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात एकुण ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यात वाडे ग्रामपंचायतीचीही निवडणुक लागलेली आहे. या पाश्वभुमिवर भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी गावाला भेट देउन नागरीकांची बैठक घेतली. ग्रामपंचायत निवडणुक काळात नागरीकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. कायदा सुव्यवस्था राखावी. गावात शांतता राखावी. कायदयाचे सर्वांनी पालन करावे. अन्यथा कडक कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी केले.
पक्ष कोणतेही असो. कुणीही गावात दुही निर्माण करु नये. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकञ यावे. अशा सुचनाही पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सदस्य ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांनी शाल, श्रीफळ देउन केला. ही बैठक वाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालयात पार पडली. यावेळी प्रास्तविक नंदलाल माळी यांनी केले.
यावेळी माजी उपसरपंच रामदास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील, माजी उपसरपंच युवराज माळी, नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे अशोक परदेशी, नंदलाल माळी, जुलाल माळी, यशवंत दुध उत्पादक संस्थेचे संचालक भावसिंग परदेशी, विजय गोमलाडू, नामदेव पाटील, रतन पाटील व पोलीस कर्मचारी लक्ष्मण पाटील यांचेसह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.