Thursday, February 2, 2023

गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; घराची सुरक्षा वाढवली

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचा दिग्गज माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीर याला इसिस काश्मीर कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून गौतम गंभीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मेलद्वारे गंभीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी काल रात्रीच ही तक्रार दाखल केली आहे. इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे.

याआधीही दोन वर्षापूर्वी गौतम गंभीरने परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगत पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. दरम्यान, भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गौतम गंभीर चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी पंजाब काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना निशाण्यावर घेतलं होतं.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे