पाचोरा – येथील गो से हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे, पूर्ण कार्यक्रम हा मुलींनी आयोजित केला होता. सूत्रसंचालन, भाषणे, आभार या सर्वांचे नियोज आयोजन शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनीच केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, पं. स. शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, ए. बी. अहिरे सर, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एस. एन. पाटील, एन. आर. पाटील, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि तैलचित्रास माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर विद्यर्थिनींनी आपल्या भाषणातून
“महाराज आज आपण असतात तर- “याद्वारे महाराजांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.डी. पाटील यांनी तानाजी मालुसरे यांनी जिंकलेल्या कोंडाणा किल्ल्या संदर्भात वास्तव परिस्थिती याबद्दल कथन केले. त्यानंतर शिवाजी महाराजांचे विषयक धोरण विषद करून पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांची कोलमडलेली परिस्थिती आणि महाराजांनी त्यावर केलेली मात यासंदर्भात सोदाहरण स्पष्टीकरण देऊन आपल्या भाषणाची सांगता केली. नंतर अध्यक्षीय समारोपात खलिल देशमुख यांनी विद्यार्थिनींचे, मुख्याध्यापकांचे आणि आयोजनाचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.