गो.पु.पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहाने साजरा

0

भडगाव(प्रतिनिधी)- गो.पु.पाटील माध्यमिक विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथे २१ जून रोजी म्हणजेच सर्वात मोठा दिवस असलेल्या दिनी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशांत पाटील यांनी प्रास्तविकातुन योगदिनाचे महत्व उपस्थितांना पटऊन दिले. प्रास्ताविकानंतर माध्यमिक विद्यालयातील क्रीडाशिक्षक बी.डी.साळुंखे सरांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखऊन प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या विद्यार्थी,विद्यार्थीनी,प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी आदींना योगा करण्यास मार्गदर्शन केले.

प्रत्येक आसनाचे महत्व साळुंखे सरांनी योगा करीत असताना उपस्थितांना समजाऊन सांगितले,तसेच प्रत्येक आसनाचे जीवनातील महत्व पटवून सांगितले. ह्या कार्यक्रमासोबतच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या भावेश धनगर,भाग्यश्री धनगर,महेश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.ह्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश बोरसे यांनी केले.

आभार प्रदर्शन एम.ए.पवार सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य आर.एस.पाटील व पर्यवेक्षक टी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका,प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

Leave A Reply

Your email address will not be published.