भडगाव ;- तालुक्यातील कोळगाव येथील क.ह.रा.पा.किसान शिक्षण संस्थेच्या गो.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वडजी-कोळगाव केंद्रातंर्गत येणाऱ्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व.तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रतिमा पुजनानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच नुकतेच शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झालेले गणेश पाटील (माजी ग.स.सोसा.संचालक) यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राजेंद्र पाटील,टी.एस.पाटील,पर्यवेक्षक ए.एन.शिंपी,केंद्रप्रमुख संजय न्हायदे तसेच वडजी-कोळगाव परिसरातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील कर्मचारी विठ्ठल सोनवणे,संजय पाटील,प्रवीण पाटील,चेतन पाटील तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
1 Comment
Leave A Reply
Cancel Reply
very nice online news update website…