३० नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
पाचोरा “मन जनम लिन्हा धरतीवर” या अहिराणी (भिलाऊ) गिताचे चित्रिकरण पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा व परिसरात करण्यात आले आहे. हे अहिराणी गित प्रेक्षकांना येत्या ३० नोव्हेंबर ला युट्युब वर बघावयास मिळणार आहे.
तालुक्यातील भातखंडे या छोट्याशा गावातील रहिवासी तथा एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश वाघ हे गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध भिलाऊ गितांचे चित्रिकरण करित असतात. त्यांच्या गितांना प्रेक्षकांकडुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत असुन प्रेक्षकांच्या खास विनंतीवरुन गणेश वाघ यांनी “मन जनम लिन्हा धरतीवर” या शिर्षकाच्या गिताचे उद्घाटन विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड यांचेहस्ते करण्यात आले असुन येत्या ३० नोव्हेंबर ला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे. या गिताचे चित्रिकरण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, साईमोक्ष लाॅन्स, गोराडखेडा व तालुक्यातील इतर ठिकाणी करण्यात आले आहे. या गितात मुख्य भुमिकेत मुंबई येथील आम्रपाली अहिरे, पंकज धुईकर (उत्राण ता. एरंडोल), एकलव्य डान्स गृपचे सह कलाकार दिसणार आहे. सदर गिताचे लेखन आप्पा सोनवणे, गीतकार व संगितकार दिपक मोरे, अॅडिटींग अल्पेश कुमावत (वडगांव टेक), कॅमेरामन गणेश महाजन (पाचोरा), मनोज कुमावत यांनी केले आहे. तसेच किरण (आबा) पाटील (गोराडखेडा), रवि ललवानी, सुमित शर्मा, सुरेश कदम, ज्ञानेश्वर सोनवणे (ओझर), आकाश गायकवाड (उत्राण), श्याम सोनवणे, सुमित बागुल, विकास शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे. या गिताची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.