जळगाव – चोपडा तालुक्यातील गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने फिनाईलच्या गोळ्या घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कांचन उमेश दाभाडे (वय28) असे या महिलेचे नाव असून ते गोरगावातील रहिवासी आहेत. त्या गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या 4 वर्षापासून परिचारिका म्हणून कार्यरत आहे. काहीतरी कारणास्तव त्यांनी फिनाईलच्या गोळ्या सेवन केल्या. यात त्या अत्यवस्थ झाल्याचे इतरांच्या लक्ष्यात आले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, प्रकृती खूपच खालवल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सासू-सासरे देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. तर पती वाहन चालक असून दोघांना तिन वर्षाचा मुलगा आहे. या परिचारिकेचे शवविच्छेदन करण्यात आले.