गोपाळ समाजहित महासंघातर्फे गरीब गरजूंना धान्य वाटप

0

जळगाव | प्रतिनिधी 

जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून जळगाव शहरात हातावर पोट भरणारी आपल्या समाजातील काही कुटुंबही सध्या कामाविना हतबल अन् एकाच जागी खिळून पडली आहे…अशा वेळेस सदैव समाजहितासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या गोपाळ समाजहित महासंघाच्या जळगाव शहरातील शिलेदारांना त्यांचा विसर पडणे कदापि शक्य नव्हते.  कोणत्याही कठीण समयी समाजासाठी सरसावणाऱ्या या  समाजनिष्ठ मावळयांनी पुनश्च एकदा आपली  सेवाभावी   वृत्ती जोपासत शहरातील जवळपास 40-50 आपल्या समाजातील  परिवारांना काल दि.10/04/2020 रोजी उन्हातान्हात शिधावाटपाचे काम स्वखर्चातून केले. यात गहु..तांदुळ..तेल ..मीठ..मिरची..मसाला या साहित्याचा समावेश होता.  हे सेवाभावी कार्य करणारे शिलेदार म्हणजे नेहमीच आघाडीवर असणारे दानशूर व्यक्तिमत्व गोपाळ समाजहित महासंघ जळगाव तालूका कार्यकुशल अध्यक्ष आदरणीय प्रकाशभाऊ गजाकुश   तसेच त्यांच्या जोडीला सदैव खांंदयाला खांदा लावून समाजकार्यात बहुमोल साथ देणारे समाजशील जळगाव ता.उपाध्यक्ष शांतारामभाऊ जाधव  तसेच समाजहितासाठी नेहमीच ज्यांच्या डोक्यातून सुपीक कल्पना निघतात असेच अग्रणी शिलेदार जळगाव ता.सचिव गोरखभाऊ नवघरे   त्याचप्रमाणे मितभाषी परंतु तत्वनिष्ठ..समाजहितैषी जळगाव शहर अध्यक्ष दिपकभाऊ गजाकुश तसेच देशसेवेनंतर समाजसेवेसाठी कधीही तत्पर असणारे जळगाव जिल्हा संघटक माजी सैनिक तुळशिरामजी साबळे   तसेच कर्तव्यशील …समाजकार्यात सतत कार्यशील असणारे जळगाव शहर सचिव आनंदाभाऊ महाजन  त्याचप्रमाणे गोरगरिबांसाठी ज्यांना सदैव माया असते…कोणताही कार्यक्रम असो वा प्रसंग त्यात हिरारीने भाग घेणारे समाजप्रेमी जळगाव शहर प्रसिद्धी प्रमुख गणेशजी भोर   तसेच नेहमीच समाजकार्यात सक्रीय असणारे जळगाव शहर पदाधिकारी सोनूभाऊ भोंगाळ प्रकाशभाऊ भोंगाळ गोपीनाथभाऊ भोंगाळ सुनिलभाऊ गजाकुश मनोजभाऊ गजाकुश इत्यादी.

Leave A Reply

Your email address will not be published.