गोदावरी कॉलेज जवळील हॉटेल जस्ट चिलवर धाड; बेकायदेशीर मद्याचा साठा आढळला

0

जळगाव ( प्रतिनिधी ) 

शहरात  सध्या डेल्टा प्लस या कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी सुरु असताना कुठलीही परवानगी नसताना ग्राहकांना टेबल उपलब्ध करून देत बेकायदेशीर दारू विक्री केली जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यावरून गोदावरी कॉलेजजवळ असणाऱ्या हॉटेल जस्ट चिलवर धाड टाकली असता ७ हजार रुपये किंमतीचे बेकायदेशीर मद्याचा साठा मिळून आल्याने मालक आणि मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शहरातील खेडी परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये रात्री ९ वाजता विना परवाना ग्राहकांना बसवुन मद्य विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल पंजारी, ईमरान सैयद, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळसकर यांनी गोदावरी कॉलेज जवळ भुसावळ रोडवर हॉटेल जस्ट चील येथे मालक सचीन पांडुरंग मराठे रा. खेडी आणि मॅनेजर योगेश कर्डीले हे त्यांच्या हॉटेलमध्ये विना परवाना विदेशी दारू बाळगुन हॉटेलमध्ये लोकांना टेबल उपलब्ध करून दारु विक्रि करीत असल्याने कारवाई केली. सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.