जळगाव ;- येथील गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च या महाविद्यालयामध्ये उडान २०१८ हा अंतीम वर्ष एम बी ए विद्यार्थ्यांचा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
या प्रसंगी संचालक डॉ प्रशांत वारके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ वारके यांनी एम बी ए नंतरच्या संधी, करीयर निवड या संदर्भात बहुमोल टीप्स दील्यात पुढे बोलतांना ते म्हणाले की आगामी काळात विद्यार्थ्यांना व्यवसायिक जिवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या समस्यांचा विचाराने सामना करायला शिका, संयमाने वागले तर यश नक्की मिळेल तसेच प्रथम नोकरीची संधी न गमावता ती किमान एक वर्ष टिकवुन ठेवावी. विद्यार्थ्यांनी कॉर्पोरेट जगतातील ज्ञान आत्मसात करावे. जिज्ञासु वृत्ती व निरंतर परीश्रम करण्याची तयारी ज्या विद्यार्थ्यांमध्ये असते तेच विद्यार्थी आव्हानांचा सामना करून यशस्वी होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याचे विविध कार्यक्रम सादर केले. वन मिनीट शो, शेलापागोटे, संगीत खुर्ची, गृप डान्स, सोलो डान्स, समाज प्रबोधनपर नाटिकाही विद्यार्थ्यांनी सादर केली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले.