यावल :- नथुराम गोडसे यांचा आतंकवादी म्हणून उल्लेख करणाऱ्या कमल हसन वर वरिष्ठ स्तरावर योग्य ती चौकशी करण्यात यावी व नथुराम गोडसे चा अपमान करणाऱ्या कमल हसन वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रामचंद्र दाजीबा पाटील तालुका अध्यक्ष मानवाधिकार संघटना नथुराम गोडसे भवन किनगाव तालुका यावल यांनी पोलीस निरीक्षक यावल यांना दिलेल्या निवेदनात तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १३ ‘मे रोजी तामिळनाडू येथील सभेत सिने अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हे सर्वात पहिले आतंकवादी होते असे उद्गार काढून कमल हसन यांनी नथुराम गोडसे यांचा जाणीवपूर्वक मते मिळवण्याकरता हेतुपुरस्कर अपमान केलेला आहे तरी नथुराम गोडसे सारख्या थोर पुरुषाचा असा अपमान करणे योग्य नाही ते आतंकवादी आहेत याबाबत त्यांचे काही पुरावा नसताना त्यांनी असे वक्तव्य करणे शोभत नाही त्यांनी जाहीर सभेत गांधींच्या पुतळ्याजवळ नथुराम गोडसेंना आतंकवादी घोषित करून व हिंदू धर्माचा जाहीररीत्या अपमान करून ते आतंकवादी आहेत असा आरोप केला याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये पुरावे सादर करावेत अन्यथा त्यांच्यावर यावल कोर्टाकडून हिंदू धर्माचा व नथुराम गोडसे यांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल असे या निवेदनात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे याबाबत एक महिन्याच्या आत असे पुरावे सादर न केल्यास कोर्टामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही रामचंद्र दाजीबा पाटील यांनी निवेदन देतेवेळी पत्र कारण जवळ सांगितले.