गोजोरा येथे जुगार अड्ड्यावर धाड ; ९ जणांविरुद्ध कारवाई

0

भुसावळ :- तालुक्यातील गोजोरा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून झनां मन्ना जुगाराचा खेळ खेळणा-या संतोष कोळी सह 9 जणांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून 2 लाख 64 हजार 500 रुपये असा एकूण माल मिळून आला असून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील फेकरी टोलनाका येथे रविवारी 5 मे रोजी  नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या  गुप्त माहिती वरून तालुक्यातील गोजरा या गावी 12 .30 वाजता धाड टाकली असता संतोष गोकुळ कोळी याचे पक्के घरात 9 लोकांसह 52 पत्ती कॅटवर झनां मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना  आढळून आले . त्याच्या आंगझडती मध्ये  रोख रक्कम 19हजार 500 रु आणि 4 मोटर सायकल व मोबाईल असा एकूण किंमत 2,64,500 रु मुद्देमाल मिळून आला .  ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड   पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस उप नि गजानन करेवाड पो हे कॉ विठ्ठल फुसे अजय माळी प्रदीप इंगळे रियाज काझी यांनी केली आहेवरील 9जणां.विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 4.5 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलाआहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.