नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील एका माजी महिला कर्मचार्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. यामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली असतानाच, सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थाच निष्कि‘य करण्याचा आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचा कटकारस्थान रचल जात असल्याचे म्हणाले होते. आता, सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी सरन्यायाधीशांना लैंगिक शोषण प्रकरणात बदनाम करण्याची मलाही ऑफर देण्यात आली होती, असे एक फेसबुक पोस्ट लिहत म्हटले आहे.
पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबुजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न होत असल्याचंही गोगोई यांनी सांगितलं. त्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालयातील वकिल उत्सव बैंस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरु माहिती दिली आहे. त्यामध्ये, सरन्यायाधीशांची बदनामी करण्याची ऑफर मला देण्यात आली होती. त्यासाठी, मला संबंधितांनी मोठी लाचही ऑफर केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगई यांना सरन्यायाधीशपदाचा राजीनामा द्यावा लागेल, अशा प्रकारे त्यांची बदनामी करण्याचा डाव होता. सदर बाब सांगण्यासाठी मी सरन्यायाधीशांच्या घरी गेलो होतो. मात्र, ते घरी नसल्यामुळे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही, असेही बैंस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.