भडगाव – रा. स. शि. प्र मंडळ चाळीसगाव संचलीत भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण विदयालयाचे मुख्याध्यापक जि. के. सानप यांचेसह उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी केले. याप्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक जि. के सानप, एस. वाय. पाटील, व्हि. ए. पाटील, डी. जे. सावळे, बी. एल. सावंत, बी. डी. बोरसे, बी. आर. साळुंखे, एस. आर. महाजन, प्रसाद देशमुख, पत्रकार अशोक परदेशी, एस. एल. मोरे आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.