जामनेर : – तालुक्यातील गोंडखेल येथील रहिवाशी पंडित भागवत कोळी वय २२ वर्ष हा दि.८ एप्रिल २० १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शनि महाराज मंदिरावर जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेला असून आजपावेतो घरी परत आलेला नाही. त्यांच्या घरच्या मंडळींनी आजूबाजूच्या परिसरासह आपल्या नातेवाइकांनाकडे त्यांचा शोध घेतला असता तो कोठेही आढळून आलेला नाही.
भागवत सुकदेव कोळी यांच्या खबरीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये दि.१० एप्रिल २०१९ रोजी १६ / २० १९ नंबर प्रमाणे पंडित हरविल्यांची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे करीत आहे. पंडित हा शरीराने सडपातळ,उंची ५ फुट असून त्यांचा चेहरा गोल आहे.त्यांने अंगात लाल रंगाचा चौकडीचा शर्ट व ब्लू रंगाची जिन्सची पन्ट घातलेली आहे. वरील वर्णनाचा युवक कोणाला दिसल्यास किंवा त्यांच्या बदल कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ जामनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.