जळगाव :- शहरातील एमआयडीसीतील गेंदालाल मिल भागात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून ९८ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश हरचंद करंदीकर (वय ३२) यांच्या घरात ही चोरी झाली आहे. उमेश यांचे मोठे भाऊ व वहिणी दादावाडी परिसरात राहतात. उमेश व त्यांचे आई-वडील सोमवारी रात्री मोठ्या भावाकडे गेले होते. या वेळी चाेरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ९८ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता उमेश यांच्या आई घरी अाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उमेश यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात चाेरीचे प्रमाण वाढले असून पाेलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी हाेत अाहे.