Tuesday, September 27, 2022

गुलाबराव पाटलांच्या कव्वाली गायनावर निलेश राणेंचे वादग्रस्त ट्वीट

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

निलेश राणेंनी आपल्या ट्विटर मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी शिवसनिकांना दिले आहेत.

निलेश राणेंचं ट्विट

निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेनेवरही जोरदार टीका केली असून, ‘असं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, अशा शब्दांत घणाघात केला आहे. निलेश राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

राणे बंधूवर गुन्हा दाखल करा अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना व जळगाव महानगर शिवसेनेतर्फे शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बळीराम हिरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की , भाजपामधील पदाधिकारी निलेश राणे व नितेश राणे हे नेहमीच आमचे येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत अर्वाच्य व शिवीगाळ भाषेचा वापर करत असतात. त्यामुळे त्याच्यावर सायबर क्राईम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, व्हाट्सअप माध्यमे बंद करण्यात यावी. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी निवेदन देतांना शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरीता कोल्हे, शहर प्रमुख ज्योती शिवदे, सारिता माळी, मनीषा पाटील, विमल वाणी, आशा खैरनार, नगरसेवक प्रशांत नाईक, अंकुश कोळी, उप महानगर प्रमुख नितीन सपके, गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, प्रशांत फाळके, शोएब खाटीक, ईश्वर राजपूत, पूनम राजपूत, विक्की शिवदे, अमोल सोनवणे, संजय सांगळे, समीर खाटीक, इकबाल शेख, जयेश बाविस्कर, चंदन जाधव, किरण भावसार, श्रीकांत आगळे, अहमद शेख आदी उपस्थित होते.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या