Wednesday, September 28, 2022

गुरे चारण्यावरून एकाला मारहाण; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

गुरे चारण्याच्या कारणावरून तालुक्यातील कंडारी येथे एका व्यक्तीला दोन जणांनी बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राजू शेख बाबु (वय ५४, रा. कंडारी ता.जि. जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते शेतीचे काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार १३ जानेवारी रोजी राजू शेख बाबु यांच्या शेताच्या बांधावर भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे याने गुरे चारण्यासाठी सोडले होते. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवार १४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता राजू शेख बाबु हे घरी गेले असता याचा राग असल्याने भाऊसाहेब राजेंद्र सुर्वे आणि मयुर विश्वासराव सुर्वे रा. कंडारी ता.जि.जळगाव यांनी चापटा बुक्क्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली.

याप्रकरणी राजू शेख बाबु यांच्या फिर्यादीवरून दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख गफुर शेख कादर हे करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या