युवक ३५ टक्के भाजला ; अज्ञात इसम फरार ,परिसरात एकच खळबळ
रावेर ;- गुरांच्या रखवालीसाठी झोपलेल्या गुराख्याला रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रकार येथे घडला असून युवक ३५ टक्के भाजला गेला आहे . त्याच्यावर उपचार सुरु असून याप्रकारामुळे खळबळ उडाली आहे . खानापूर येथील हि घटना आहे
संदीप अशोक धांडे (वय २२) असे या युवकाचे नाव आहे . गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
खानापूर येथील संदीप धांडे हा रेल्वेमार्गालगतच्या गावाबाहेरील वाड्यात गुरांची रखवाली करण्यासाठी झोपला होता. वाड्यातील सुरू असलेला बल्ब काढून दोन अज्ञात इसमांनी त्याच्या अंगावर पेट्रोल मिश्रीत रॉकेल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
दरम्यान, आगीमुळे विव्हळत संदीप अशोक धांडे याने बाहेर धाव घेतली असता बाहेर उभा असलेल्या एका अज्ञात इसमाने घटनास्थळावरून धूमठोकली .