गुरांचे मांस वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला अडवून मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील कालिंका माता चौकात गुरांचे मांस वाहून नेणार्‍या टेम्पो पाठलाग करून त्याला अडवत, चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.

एका टेम्पोमधून गुरांचे मांस वाहून नेत असल्याची माहिती नशिराबाद येथील काही तरूणांना मिळाली. त्यांनी या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, यासंदर्भात जळगाव येथे काही जणांना याची माहिती देण्यात आली. यामुळे हा टेम्पो रात्री पावणेअकराच्या सुमारास कालींका माता चौकात अडविण्यात आला.

येथे तरूणांनी टेम्पोत प्लास्टिकच्या ड्रममध्ये गोवंशाचे मांस असल्याचे आढळून आले. यामुळे तरुणांनी टेम्पोच्या काचा फोडल्या आणि चालकास मारहाण केली. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तसेच महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. एमआयडीसी पोलिस, दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवले. टेम्पो चालकास ताब्यात घेतले.

दरम्यान, याप्रसंगी एक कार ही टेम्पोच्या पुढे टेहळणी करण्यासाठी धावत असल्याचे दिसून आल्याने काही जणांनी कारचा पाठलाग केला. मात्र कार चालक पळून जाण्यात यशस्वी ठरला. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here