गुरांची अवैध वाहतुक करणारे वाहन जप्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धरणगाव हायवे चौफुली वर नाकाबंदीच्या कर्तव्यावर असतांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांनी ३० हजार रूपये किमतीच्या ५ बैलांची अवैध वाहतुक करणाऱ्या पिकअप गाडीला रंगेहाथ पकडले. एम.एच.०५ बी.एच.९२०३ क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी ५ बैलांना कत्तलिसाठी नेण्याच्या उद्देशाने धरणगाववरून   म्हसावद कडे जात असताना पकडले.

याप्रकरणी  एरंडोल पोलीस स्टेशनला भाग ६ गु.र.नंबर कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुुधारणा) अधीनियम १९९५ चे कलम ५ अ (१) प्रमाणे प्राणीक्लेश प्रतीबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामू अर्जून शिंदे व अनिल रमेश नोजे दोघे रा.दहीवद ता. शिरपूर (धुळे) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पाटील, संदीप पाटील,संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.