जळगाव – शहरातील बी.जे. मार्केट समोर व गुजराथी गल्लीत मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करत गटारीवरील बांधकामे गुरुवाररी जमीनदोस्त केली.
शहरातील जेएमपी मार्केट समोरील देशी दारु दुकानासमोरील गुजराथी गल्लीतील गौरी एन्टरप्रायजेस ते जुने बी.जे. मार्केट कालिका देवी मंदिरापर्यंत कारवाई करण्यात येवून दोन्ही बाजुच्या गटारीवरील बांधकामे तोडण्यात आली. नवीन बी.जे. मार्केट परिसरातील पोलीस ठाण्याच्या समोरील गटारीवरील अतिक्रमण काढण्यात आले. कालिका माता मंदिराशेजारील राधेराधे, सत्यब्रह्म भरीत सेंटर व याच रांगेत एका घराचे गटारीवरील अतिक्रमण काढण्यात आले. बुधवारपासून सदर कारवाईला सुरुवात झाली. बुधवारी काहींनी आपले अतिक्रमण काढून घेतले. उर्वरितवर मनपाने कारवाई करीत अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर सदर रस्त्याची रुंदी वाढली आहे. आजही कारवाई होणार असून गटारीवरील अतिक्रमणे आधीच काढून घेण्याच्या सूचना विभागाकडून दिल्याचे सुत्रांनी सांगितले.