अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसच्या ४ आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांना सादर केले. हे राजीनामे स्वीकारले असल्याचं त्रिवेदी यांनी पत्रकारांना सांगितलं. या ४ आमदारांची नावं अद्याप जाहीर केलेली नाहीत. येत्या २६ मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे दिले असल्याचं म्हणत जात आहे.
या चार आमदारांच्या राजीनाम्यामुळे १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ ७३ हून कमी होऊन ६९ झालं आहे.