गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ? ; जामनेरच्या व्यापारी संकुलाच्या चौकशीसाठी समिती जळगावात दाखल

0

जळगाव । जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर खटोड बंधू भागीदार असणार्‍या कंपनीला व्यापारी संकुल बांधण्याची परवानगी देऊन २०० कोटी रूपयांचा घोटाळा झालेला असून यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केला होता. दरम्यान, या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारच्या ग्राम विकास खात्याने नेमलेली समिती आज जिल्हा परिषदेत दाखल झाली. यामुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

जामनेर येथील व्यापारी संकुलाच्या बांधकामात २०० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप ऍड. विजय पाटील यांनी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ३० मार्च रोजी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने तत्काळ दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे सहायक आयुक्त मनीष सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून सहायक आयुक्त (चौकशी) राजन पाटील व सदस्य सचिव म्हणून सहायक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे सहायक आयुक्त मनीष सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून सहायक आयुक्त (चौकशी) राजन पाटील व सदस्य सचिव म्हणून सहायक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.

समिती अध्यक्ष मनीष सांगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,  राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण असून  याची प्राथमिक माहिती घेत आहोत. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे याची माहिती आधी आम्ही स्थानिक प्रशासनाकडून घेणार आहोत

Leave A Reply

Your email address will not be published.