तहसीलदारांनी पकडले चार ट्रॅक्टर
एरंडोल :- एरंडोल तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी दि.२४ जुलै रोजी दुपारी चार वाजता चार वाजता टाकरखेडा ता.एरंडोल या गावाजवळ गिरणा नदी पात्रात वाळु वाहतुक करणा-या चार ट्रॅक्टर ला पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.२४ जुलै रोजी तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांनी स्वतः पथकात जाऊन ट्रॅक्टर क्र.MH.19 – AN 0160 स्वराज लाल रंगाचे,MH 19 P 4236 स्वराज निळा रंग 735,विना नंबर स्वराज लाल निळा 744 EFE,MH 19 1961 स्वराज निळा 735 EFE,जप्त करुन सदर वाहन एरंडोल तहसीलच्या आवारात लावुन एरंडोल पोलिसांच्या निगराणीत ठेवले आहे.आज संध्याकाळ पर्यंत महसुल विभागातर्फे कुठलाही पंचनामा झालेला नसुन सदर पंचनाम्यास विलंब का होत आहे ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.याबाबत तहसिलदार यांना विचारणा केली असता सदर ट्रॅक्टर हे जळगाव येथील ठेकेदाराचे असल्याचे तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांनी सांगुन याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
दरम्यान सध्या एरंडोल तहसील तालुक्यात चोरटी वाळु वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे.त्या अनुषंगाने हनुमंतखेडे येथील काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण देखील केले होते.तालुक्यात सर्वच ठिकाणी चोरटी वाहतुक सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे असुन एरंडोल शहरातून मध्यरात्री देखील सुसाट वेगाने अवैध वाळु वाहतुक करणारी वाहने जातांना दिसुन येतात.अवैध वाळु वाहतुकीला पुर्णपणे आळा बसविणे हे महसुल यंत्रणेच्या आवाक्या बाहेरची बाब आहे अशी चर्चा पर्यावरण प्रेमींमध्ये होत आहे.तसेच तालुका प्रशासनातर्फे वाळु चोरी करण्या संदर्भात करण्यात आलेल्या करवाई च्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाळूचे गिरणा नदीतुन प्रचंड प्रमाणात अवैध उत्खनन उपसा व वाहतुक होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.