भडगाव – तालुक्यातील बात्सरसह 13 गावातील पाणीपुरवठा योजनासांठी जुने घुसर्डी व बात्सर गावाजवळ गिरणा नदिवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी बात्सरचे माजी सरपंच भास्कर पाटील यांच्यासह परीसरातील संरपंचानी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यानी बंधार्याच्या सर्वेक्षणाचे आदेश लघु पाटबंधारे विभागाला दिले आहे. दुपारी दोन वाजता अधिकार्यानी गिरणेची पाहणी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे 13 जुन ला वादळी पावसात नुकसान झालेल्या शिवाराची पाहणी करण्यासाठी भडगाव तालुक्यात आलेले होते. यावेळी बात्सर येथे माजी सरपंच भास्कर पाटील यांच्यासह परीसरातील सरपंचानी गिरणा नदिवर पाणीपुरवठा योजनांसाठी बंधारा करण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लघु पाटबंधारे विभागाला बंधार्याच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दि. २१ रोजी दुपारी दोन वाजता लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता जयंवत महाजन, आर.जे.पाटील यांनी गिरणा नदिची पाहणी केली. लवकरच ते सर्वेक्षण पुर्ण करून अहवाल सादर करणार आहेत. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भाजपयुमो चे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, माजी सरपंच भास्कर पाटील, चुडामण पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.