भडगाव (प्रतिनिधी) : शहरातील जुन्या मटन मार्केटजवळ गिरणा नदीकाठी एक स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याची घटना दि ३ रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील जुन्या मटन मार्केट जवळ गिरणा नदीच्या काठी एक स्त्री जातीचे बेवारस अर्भक मृत स्थितीत आढळून आले. हे सहा ते आठ महिने पूर्ण झालेले पण नुकतेच जन्मलेले असण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिस पाटील भुषण पाटील यांच्या माहितीवरून भडगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हे अर्भक येथे कोणी टाकून दिले असावे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रल्हाद शिंदे करीत आहे.