गिरणा धरणातून २००० क्युसेस पाण्याचे आवर्तन सुटले

0

चाळीसगाव :- गेल्या महिन्याभरापासून भडगाव व पाचोरा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्याकरिता पाचोरा भडगाव पालिकेकडून गिरणा धरणातून पाणी सोडण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी २००० क्युसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे तूर्त तरी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

गिरणा धरणाचे पाणी हे चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तीन तालुक्यांची तहान भागवित असते. मात्र गेल्या दोन महिन्यापासून भडगाव व पाचोरा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी भडगाव पाचोरा पालिकांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २००० क्सुसेस पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन सुटल्यामुळे तूर्त पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सदर पाणी आठ ते दहा दिवस आवर्तन राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.