गिरड येथे संपूर्ण गावात केली हायड्रोक्लोराइडने फवारणी

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गिरड येथे कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव जिल्ह्यात दिसून येत असल्याकारणाने हळूहळू जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे जात असल्याने ग्रामीण भागात देखील तो पाय पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून अतिदक्षता म्हणून गिरड ग्रामपंचायतीने व त्यांच्या समवेत गिरड विकास मंचने संपूर्ण गिरड गावातील निर्जंतुकीकरणासाठी लहान मोठ्या गल्ल्या गावातील सर्व दुकाने, रेशन दुकाने, दवाखाने, लहान-मोठ्या वस्त्या, सरकारी दवाखाना, कर्मचारी निवासस्थान, बँक परिसर, सर्व वाहने व शाळा अंगणवाड्या व मंदिर परिसर, मस्जिद, गुरांचे गोठे, सर्व मुख्य रस्ते, भाजी मंडी इत्यादी सर्व सोडियम हायड्रोक्लोराइड ट्रॅक्टरने फवारणी करून निर्जंतुक करण्यात आली आहे.

यावेळी सरपंच संजय पाटील, पोलीस पाटील विनोद मनोरे व गिरड विकास मंचचे काशिनाथ पाटील, पांडुरंग जाधव सह कर्मचारी रवी दादा, अमोल सह गिरड विकास मंचचे काशिनाथ पाटील यांच्या बाबत विशेष म्हणजे ते जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथे कनिष्ठ महाविद्यालयाला प्राध्यापक असून बिना पगारी ते काम करीत आहे. प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना ते म्हणाले मन रमण्यासाठी वीणा पगारी विवंचनेतून बाहेर येण्यासाठी कोरणा विषाणूच्या महा मारीला गाडण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न असे ते म्हणाले त्यांच्यासमवेत सर्व सदस्य पूर्णवेळ हजर होते कोरोना विषाणू चा मुकाबला करण्यासाठी ग्रामपंचायत सह गिरड विकास मंच परिश्रम घेत आहे. यात कोरोना हरणार हे मात्र नक्की आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.