गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या डोसचे लसीकरण

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथे गेल्या आठ दिवसापासून शासनाकडून लसीकरण पुरवठा थांबल्यामुळे येथील लसीकरण थांबले होते आज १५० लोकांना पहिल्या डोसे लसीकरण करण्यात आले.

यात ४५ वर्षाच्या वरील नागरिकांना या लसीकरण याचा लाभ मिळाला ग्रामीण भागात देखील लसीकरणासाठी लोक उत्सुक आहेत परंतु लसीकरणाचा तेवढा पुरवठा होत नाही त्यामुळे तरी याकडे शासन स्तरावरून लक्ष देण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित लसीचा पुरवठा केल्यास लसीकरण करण्याचा वेग वाढेल पर्यायाने कोरोना प्रतिबंधात्मक आळा बसेल तरी लसीची उपलब्धता झाली पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे असे सामान्य नागरिकांना वाटत आहे.

लसीकरण करून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्तव्यदक्ष डॉक्टर व कर्मचारी डॉ. दीपक राजपूत, आरोग्य सहाय्यक बी.एम. धनगर, एस.एस. निकम, आरोग्य सहाय्यक एस. बी. शिंपी, ए. व्ही. पाटील, परिचर महेंद्र वाणी, अनिल पवार, सहाय्यक परिचारिका कल्पना बहिरूपे, लॅब टेक्नीशियन गौतम गायकवाड यांनी परिश्रम घेतले गावातील माजी सैनिक यांनी या कामी चोख बंदोबस्त राखला.

Leave A Reply

Your email address will not be published.