भातखंडे प्रतिनिधी : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी एक लाख रुपये कंपाउंड दुरुस्तीसाठी तर भातखंडे येथीलच मराठी शाळेसाठी देखभाल दुरुस्तीसाठी तीन लाख रुपये विकास निधी मंजूर झाला. असून यासाठी विशेष प्रयत्न राष्ट्रवादीचे क्रियाशील सदस्य प्रा. हरीश पाटील पिंपरखेड यांनी विशेष प्रयत्न केले.
कंपाउंड वाल दुरुस्तीच्या उद्घाटन प्रसंगी प्रा. हरीश पाटील उपसभापती प्रताप सोनवणे अंतुर्लीचे माजी सरपंच दादा भाऊ बनकर अंजनविहीरेचे संभाजी पाटील, गिरडचे सुनील पाटील, भातखंडेचे अशोक पाटील,अरुण पाटील, गोरख पाटील, अजाब पाटील, सुधाकर पाटील, नितीन पाटील सह गावातील युवा नेतृत्व प्रा. योगेश पाटील अनेक तरुण उपस्थित होते.