गिरडचे अमोल बोरसे यांनी मुंबई पोलीस दलात केली अभिनंदनीय कामगिरी

0

 भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या गिरड येथील रहिवासी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल सुभाष बोरसे सद्यस्थितीत मुंबई पोलिस दलात २००६ ला भरती झालेले असून सध्या ते साकीनाका पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्यांनी पोलीस दलात काम करीत असताना नुकतीच अभिनंदनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस उपायुक्त विश्वास नागरे पाटील यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्याचे अभिनंदन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की साकीनाका पोलीस ठाणे हद्दीत संघर्ष नगर चांदिवली मुंबई येथे मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाचा साठा असलेबाबत गोपनीय माहिती द्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम पाडवी यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्या नुसार पोलीस निरीक्षक बुधन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम पाडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक भारत वाघे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत ढवन, पोलीस उपनिरीक्षक उमेश दगडे, यांच्या समवेत पोलिस हेडकॉन्स्टेबल गिरड येथील रहिवासी असलेले  अमोल सुभाष बोरसे यांनी  संघर्ष नगर चांदिवली साकीनाका मुंबई येथे छापा टाकून एकूण ३४५किलो ५२४ ग्रॅम गांजा किंमत अंदाजे रुपये ५१ लाख ८२ हजार ८७५ रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीदार व तांत्रिक कौशल्याच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती प्राप्त करून आरोपी इसम नामे अशोक माणीक मेत्रे वय ३९ वर्षे यास अटक करण्यात आलेली असून माननीय पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी, परिमंडल १०, मुंबई माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, साकीनाका विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख साकीनाका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वर नमूद पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली असून पोलिस ठाणे साकीनाका विशेष स्थानिक गुन्हा नोंद क्रमांक ४/ २०२१ कलम ८ (क),२०(ब )(ii)(क)अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या विशेष कामगिरीबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी त्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष सत्कार केला त्यांच्या अभिनंदनीय कामगिरीबद्दल गिरड सह परिसरात कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे  ते गिरड येथील आदर्श शेतकरी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सुभाष रामराव पाटील यांचे ते चिरंजीव असून त्यांच्या धाडसी कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here