गावठी हातभट्टीवर छापा टाकून ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा मार्गावर एका ठिकाणी छापा टाकुन ६३ हजार रूपयांचे गावठी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहनासह एका संशयिताला ताब्यात घेतले आहेत.

यावल तालुक्यात अन्न व औषधी  प्रशासन विभागाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षित कारभारामुळे तालुक्यात सर्वत्र महिन्याला लाखो रुपयांच्या गुटक्याची सर्रासपणे विक्री होत आहे. त्याचे काय असा प्रश्न नागरीक करीत आहे.  मागील तीन ते चार वर्षापासून शेजारच्या गुजरात आणि मध्यप्रदेश या परप्रांतातुन विविध खाजगी वाहनाने गुटक्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जात असून सर्रासपणे तालुक्यातील यावल शहर फैजपुर शहर व इतर मोठी गावे या ठिकाणी सुमारे ३० ते ४० लाखांचा गुटका पानमसाला मोठ्या प्रमाणावर विकण्यात येत आहे. अगदी सहज कोणत्याही पानटपरी असो किंवा गल्लीबोळातील छोट्यातली छोटी किराणा दुकान या ठिकाणी काही मिळो न मिळो मात्र गुटका पानमसाला हा आर्वाजुन मिळत असतो.

प्राप्त माहीतीनुसार,  खालपासुन तर वरपर्यंत सर्वांना वेळेवर हप्ते मिळत असल्याने याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य उत्पादनची काल झालेली कार्यवाही म्हणजे अर्थकारणाचे हिशोबाचे गणीत चुकत्याने उशीरा सुचलेले शहाणपण असेच म्हणावे की काय असा प्रश्न नागरीक करीत आहे. दरम्यान आज ही यावल शहरात आणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावटी दारू व पनीची दारू खुलेआम शहरातील विविध ठिकाणी व गावागावात राजरोसपणे विक्रीला जात असल्याने अनेक अल्पवयीन मुलं ही व्यस्नाधीन होत असुन त्यांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे भयावह  चित्र निर्माण झाले आहे. त्यावेळी राज्यउत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई ही नुसता देखावा असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.