Friday, September 30, 2022

गावठी कट्ट्यासह हद्दपार आरोपी अटकेत

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भुसावळ येथे हद्दपार आरोपी आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत संशयीताला अटक केली. संशयीताकडे गावठी कट्टा व धारदार चाकू आढळल्याने तो जप्त करण्यात आला. हद्दपारीचे उल्लंघन व आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

हंसराज रवींद्र खरात (वय २२, रा.समतानगर, भुसावळ) असे संशयीताचे नाव आहे. पो नि दिलीप भागवत यांना संशयीत खरात काल मध्यरात्री रेल्वे स्टेशनकडील आर.बी.सेकंड रेल्वे कॉलनीजवळ शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. संशयीत दुचाकीवर येत असतानाच त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस, शंभर रुपये किंमतीचा चाकू व 30 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो नि दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि गणेश धूमाळ, बाजारपेठ शोध पथकातील प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, योगेश माळी, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, निलेश चौधरी, ईश्‍वर भालेराव, जीवन कापडे, परेश बिर्‍हाडे आदींनी ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन व प्रशांत लाड करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या