Wednesday, September 28, 2022

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी पोलीसांच्या जाळ्यात

- Advertisement -

भुसावळ | प्रतिनिधी 

- Advertisement -

गावठी बनावटीचा कट्टा व चाकूच्या धाकावर नशिराबाद येथे दहशत माजवणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मो.हाशीम मो.सलीन खान (41, रा.प्रल्हाद नगर, रिंग रोड, 15 बंगला जवळ, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू अशी हत्यारे जप्त करण्यात आली आरोपीविरोधात नशिराबाद पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपी मो.हाशीम यास पुढील तपासकामी नशिराबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध यापुर्वी भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर आदी पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार संदिप रमेश पाटील, पोलिस नाईक प्रवीण जनार्दन मांडोळे, पोना परेश प्रकाश महाजन व रविंद्र रमेश पाटील आदींनी केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या