गायीच्या दुधाचे दर वाढणार

0

पुणे : अमूलच्या दुधाच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. गायीच्या दूध दरामधे प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला. नवे दर ८ जूनपासून लागू होणार आहेत.

दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कात्रज येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात बैठक झाली. त्यात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के, संघाच्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, ऊर्जा दूध संघाचे प्रकाश कुतवळ, सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने, शिवामृतचे धैर्यशील मोहिते या वेळी उपस्थित होते. या दूध संघाचे राज्यभरात ११० सदस्य आहेत. गेल्या आठवड्यातच काही खासगी दूध व्यावसायिकांनी गायीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ केली आहे. पाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक संघ आणि उर्वरीतखासगी व्यावसायिकांनी देखील भाव वाढीचा निर्णय घेतला. म्हशीचे भाव मात्र पुर्वी प्रमाणेच कायम राहणार आहेत. सध्या बाजारात गायीचे दूध ४२ ते ४४ आणि म्हशीचे दूध ५२ चे ५६ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.