गाडगेबाबा अभीयांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवली मल्टि स्पेसिलिस्ट हायब्रिड सायकल

0

भुसावळ :- आजच्या काळात वाहतुकीसाठी  विविध  वाहनांचा वापर केला जातो या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी इत्यादी इंधन इंधनाचा वापर होतो. ही इंधने  मर्यादित असून यांचा वापर केल्याने पर्यावरणाचे देखील  नुकसान  होते. तसेच पेट्रोल डिझेल यांच्या दरात नेहमीच वाढ होत असते. या सर्व समस्यांनावर उपाय म्हणून भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या जयेश भोई, गितेश पाटील, सागर जोहरे, निखील नेमाडे, पवन पालवे, मयुर तायडे, विवेक तायडे, क्रितिका सुडेले, निकिता सुडेले, गरीमा सिंग यांनी सहा महिन्यांच्या संशोधनानंतर हायब्रिड सायकल निर्माण केली.

ह्या सायकलमध्ये इ बाईक इलेक्ट्रिक मोटर, २४ व्होल्ट, ७ अम्पइयर हव्हर बॅटरी, डायनॅमो, ४० वॅट सोलर प्लेट, पीडब्लूएम कंट्रोलरचा वापर केला आहे. सायकल ३० किलोमीटर पर्यंत २३ किलोमीटर प्रति तासाच्या गतीने धाऊ शकते. उदा. भुसावळ ते जळगाव सहज प्रवास शक्य होईल कारण सोलरमुळे फ्री चार्जिंग होते किंवा विद्युत चार्जिंग केल्यास ३ युनिट म्हणजेच १२ रुपये खर्च येऊ शकतो. भुसावळ ते जळगाव एका फेरीसाठी ४० पेक्षा जास्त रुपये खर्च होतो. सदर प्रकल्पामुळे साधारणतः ७५ %  पैश्यांची बचत होते व प्रदूषणसुद्धा होणार नाही.

सायकल चार्जे करण्यासाठी सौर ऊर्जेसोबत आणि त्यासोबत अस्तित्वात असलेल्या विद्युत प्रवाहाचा वापर करू  शकतो. बॅटरी  पॉवर संपली असल्यास  आपण पैडलद्वारे देखील चालऊ शकतो. २५००० हजार खर्च आलेल्या ही सायकल प्रा. गौरव टेंभुर्णीकर व विभागप्रमुख प्रा. अजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली आहे.

पॉवर लॉक सिस्टीमच्या साहायाने चाबीमुळे सायकल सुरक्षित राहणार आहे. चोरी होण्याला आळा मिळेल तसेच किंवा बॅटरी सुरू किंवा बंद करणे सोयीचे ठरेल. हेड लाईट, बॅक लाईट इंडिकेटर, टर्निंग इंडिकेटर उपलब्ध केलेले असून हॉर्न सोबत गती दर्शवण्यासाठी डिजिटल स्पीडो मीटर लावण्यात आले आहे. एमपीपीटी सोलर चार्जे कंट्रोलरच्या मदतीने सोलर किरणे अधिक असलेल्या भागातुन ऊर्जा घेऊन बॅटरी चार्जे करते. गती कमी जास्त करण्यासाठी थ्रोटल वापरण्यात आले आहे.

भविष्यात पेट्रोल पंपासारखे चार्जिंग स्टेशन तयार केले जाऊन अभियंत्यांना मोठ्या प्रमाणावर स्वयं रोजगार मिळणार आहे असे विभाग प्रमुख प्रा.अजित चौधरी यांनी सांगितले.

प्रदूषण कमी करणाऱ्या अश्या प्रकल्पांना शासनाने आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले पाहिजे. या प्रकल्पात नवीन संशोधन करून सायकल अधिक सोयीस्कर बनवून स्वस्त करण्याचा प्रयन्त करणार आहोत असे सागर जोहरे याने सांगितले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीची वाढ करणयासाठी महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च प्रोग्राम आयोजित केले जातात त्याच विद्यार्थ्यांना फायदा होत आहे, पुढील काही वर्षात नवीन प्रकल्प निर्माण करण्याची प्रेरणा या विद्यार्थ्यांनी दिली आहे असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.

हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, ऍड. महेशदत्त तिवारी, सत्यनारायण गोडयाले तसेच प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.