‘बा-बापू 150’ या प्रकल्पा अंतर्गत वाकोद येथे उपक्रम
जळगाव ;– – ‘बा-बापू 150’ या प्रकल्पा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 वी जयंतीचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वाकोद येथे तीन दिवसीय श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास आरंभ झाला.
महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशन ‘बा-बापू 150’ प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पा अंतर्गत संपूर्ण भारतातून 150 गावांमध्ये लोकसहभागातून विविध समाजभिमुख उपक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशन राबवित आहे. याअंतर्गतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जैन फार्म वाकोद येथे आयोजित या शिबिरात एकूण 52 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. मान्यवरांच्याहस्ते महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलनाव्दारे या शिबीराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जैन फार्म वाकोदचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. व्ही. के. चौधरी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी सुधीर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर गिरासे यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. शिबिरार्थी स्नेहल भगत, शुभम वानखेडे, दिव्येश पांढरे, डी. एस. निकम यांनी मनोगत व्यक्त केले. आर. एस. चौधरी यांनी आभार मानले.