Thursday, August 11, 2022

गांजा तस्करीप्रकरणी धरणगावातून एकाला अटक

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्कजळगाव जिल्हा गांजा तस्करांचा अड्डाच बनत चाललंय. मागील काही महिन्यांपुर्वी एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात गांजा वाहतूक प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला मध्यप्रदेशातील एनसीबीच्यापथकाने धरणगाव शहरातून अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जुलै २०२१ मध्ये मध्यप्रदेशातील इंदोर येथे गांजा तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात गांजा तस्करीचे कनेक्शन एरंडोल-कासोदा भागात असल्याचे या अधीच निष्पन्न झाले होते. याबाबत मध्यप्रदेशातील एनसीबी पथकाने चौकशीला सुरूवात केली होती. त्यानुसान मध्य प्रदेश एनसीबीचे अधिकारी-कर्मचारी एरंडोल भागात येवून तस्करीवर नजर ठेवून होते.

अशाच गांजा तस्करीचे कनेक्शन हे धरणगावतही आसल्याचे आढळून आल्याने एनसीबीच्यापथकाने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी विजय किसन मोहिते (रा. सरस्वती कॉलनी, एरंडोल, ह.मु. धरणगाव एरंडोल रोड ता. जि. जळगाव ) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या कारवामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर कारवाई एनसीबीचे दोन अधिकारी एक कर्मचारी यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या