जळगाव | शहरातील मेहरूण येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. शुभांगी संग्राम नेरपगार (वय 33 रा. मेहरूण) असे या मृत आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभांगी नेरपगार या शिवणकाम करण्याचे काम करतात. त्यांचे पती संग्राम नेरपगार यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना 11 वर्षाचा तुषार नावाचा मुलगा आहे. पती मयत झाल्यानंतर ती माहेरी आई-वडिलांकडे भावासह राहत होत्या. शुभांगी नेरपगार यांनी सुमारास घरात कोणीही नसताना दोरीच्या साह्याने छताच्या पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचे आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.