गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा!

0

जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासनातर्फे  प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परंतू जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे असलेले  10 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

कोणतीही  परिस्थिती निर्माण झाल्यास अडचण येवू नये, जिल्ह्यातील नागरीकांना तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयास व्हेंटीलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देण्यात येत असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच नागरिकांनी गर्दीचा ठिकाणी जाऊ नये काही ही लक्षणे आढळ्यास तपासणी करून घ्यावे. तसेच संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारतात आतापर्यंत 117 रुग्णांची नोंद झाली आहेत. तर राज्यात एकूण 37 रुग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या 10 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 8 रुग्णांचे नमुने तपासणीत निगेटिव्ह आलेले आहेत. एका व्यक्तीचा रिपोर्ट येणे बाकी असून आज एका व्यक्तीचा नमुना पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तसेच  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व धर्मियांनी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, व्यायामशाळा, जलतरण , मॉल्स आदि गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. कोरोना व्हायरसाचा धोका लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा रुग्णांसाठी 10 बेड राखून ठेवण्यात आले आहे. तर 5 बेडचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली. याठिकाणी तातडीच्या उपाय योजना म्हणून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिल्यात.

कोरोना संदर्भातील उपाययोजनांविषयी पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडून माहिती जाणून घेतली. तसेच समाज माध्यमांतून कोरोना संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा पसरवणार्‍याची पोलिसात तक्रारी  करू. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील यांचेसह विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाबरू नका, घाबरू नका…! 

जळगाव – राज्यासह देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. दक्षतेचा उपाय म्हणून शासन आणि प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाला दूरच ठेवण्यासाठी मुस्लीम बांधवांनी देखील सहकार्य करावे. दररोज मस्जिदमध्ये नमाज पठण करताना स्वच्छतेचे योग्य उपाय योजावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपात महापौर भारती सोनवणे यांनी शहरातील सर्व मुस्लीम धर्मगुरू, प्रमुख मुस्लीम बांधव आणि मौलानांची बैठक बोलावली होती. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, रियाज बागवान, ईबा पटेल, नवनाथ दारकुंडे, सदाशिव ढेकळे यांच्यासह गफ्फार मलिक, करीम सालार, ऍड.जमील देशपांडे, शाहिद शेख, फारुख कादरी आदींसह मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती अतिकुरहेमान, मौलाना सलीक, ज़िया बागवान, डॉ.अल्तमश शेख, शरीफ शाह, सय्यद चांद, जमिल शेख़, अनिस शाह, जफर शेख व मौलाना उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.