गरुड विद्यालयात संस्थेचे श्रध्दास्थान कै. अण्णासो भास्करराव खंडेराव गरुड यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
शेंदुर्णी:-धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी याठिकाणी संस्थेचे श्रद्धास्थान कै.अण्णासो भास्करराव खंडेराव गरुड यांची 16 वी पुण्यतिथी सोहळा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन दादासो संजयरावजी गरुड,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सतीशजी काशीद,संस्थेचे संचालक सागरमल जैन,महिला संचालिका उज्वलाताई काशीद, इत्यादी प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजन करून करण्यात आली.या नंतर विद्यालयचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी आपले प्रस्ताविक केले त्यानी आपल्या प्रास्ताविका मध्ये कै.अण्णासो भास्करराव खंडेराव गरुड यांच्या कार्याचा माहिती त्यानी दिला.
या नंतर उपस्थित मान्यवरचा सत्कार समारंभ करण्यात आला. या मध्ये विशेष सत्कार हा विद्यालयचा माजी विद्यार्थी अनिकेत अजय सुर्वे डॉ.अजय सुर्वे यांचे चिरंजीव यांचा नंबर हा आण्णासाहेब डांगे वैद्यकीय महाविद्यालय सांगली या ठिकाणी M. S (Surgan)लागला म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच विद्यालयाचा इयत्ता 8 वी चा विद्यार्थी आदित्य सुरेश गावंडे याचा माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला त्या बद्दल त्याचा पालक समवेत सत्कार करण्यात आला,या नंतर उपस्थित मान्यवरान पैकी संस्थेचे संचालक सागरमल जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानी आपल्या मनोगत मध्ये आण्णासाहेबच्या बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.या नंतर संस्थेचे सचिव सतीशजी काशीद यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानी आपल्या मनोगत मध्ये आण्णासाहेबच संस्थेमध्ये असणाऱ्या योगदाना बद्दल माहिती सांगितली. या नंतर माजी विद्यार्थी अनिकेत सुर्वे याने आपले मनोगत व्यक्त केले, या नंतर कार्यक्रम चे अध्यक्ष कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन दादासो संजयरावजी गरुड यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानी आपल्या मनोगतात अण्णासाहेबांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली, या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवराची उपस्थिती लाभली संस्थेचे चेअरमन दादासो संजयरावजी गरुड, संस्थेचे सचिव सतीशजी काशीद,संस्थेचे संचालक सागरमल जैन,महिला संचालिका उज्वलाताई काशीद, डॉ. अजय सुर्वे,जि. प शिक्षक सुरेश गावंडे ,पत्रकार बंधू दीपक जाधव, अतुल जहागीरदार,अॅड. देवेंद्र पारळकर, विलास आहिरे,सुनील गुजर,विद्यालयचे मुख्याध्यापक एस.पी उदार, उपमुख्याध्यापक एस.सी चौधरी, पर्यवेक्षक आर एस परदेशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अनेक मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी लाभली याबरोबर अण्णा साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आली तसेच आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड प्राथमिक विद्यालय शेंदुर्णी या ठिकाणी देखील अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांची 16 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शासनाने घालून दिलेल्या कोरोना संदर्भात नियमांचं तंतोतंत पालन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी जी पाटील यांनी केले तर आभार डी बी पाटील यांनी मानले.