गरुड विद्यालयात पोलीस दलाकडून शस्त्रास्त्रांची माहिती

0

शेंदुर्णी- पोलीस वर्धापन दिनानिमित्त रायझिंग डे येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिनाचा इतिहास आणि पोलीस दल वापरत असलेल्या विविध शस्त्रांची माहिती राकेश सिंह परदेशी स. पो. नि. पहूर पोलीस  स्टेशन,पहूर यांनी दिली.

काब्रोईन अश्रुधुरा ची  नळकांडी अशी भिन्न शास्त्रे प्रत्यक्ष दाखवून त्याची मारक क्षमता व उपयोग यासंबंधी इत्यंभूत माहिती त्यांनी दिली प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. उदार व शिक्षक शिक्षिका हजर होते. पोलीस गृहरक्षक दलातील ईश्वर देशमुख,प्रशांत विरणारे, मनोज गुजर,जगदीश चौधरी, एन. एन. तडवी,जितू सिंग परदेशी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले विद्यार्थ्यांना ही शस्त्रे जवळून पाहता आणि हाताळता आली न पाहिलेली ही हत्यारे पाहताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अप्रूप आणि अमाप उत्साह दिसत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.