शेंदुर्णी :– येथील अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. धी शेंदुर्णी सेकं एज्यू को- ऑप सोसायटी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे . प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मा . दादासो . संजयजी गरुड यांचे वाढदिवस पर आभिष्टचिंतन करण्यात आले महाविद्यालयाच्या प्रांगणात वडाच्या झाडाच्या रोपाची तसेच वृक्ष लागवड प्रेरणादिन प्रित्यर्थ करण्यात आले .सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले . तसेच आदरणीय बापुसो .
गजाननराव गरुड व आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहार व माल्यार्पण करून मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य डॉ . वासुदेव आर पाटील यांनी केले . माजी विद्यार्थी व महाविद्यालय यांचे नाते आई व तिचे अपत्य या सारखे असते असे ते म्हणाले .विद्यापीठाने गौरविलेले उत्कृष्ट महाविद्यालय असल्याचे तसेच संस्थेने पाठबळ दिल्याचे ऋण भावना त्यांनी व्यक्त केल्या . माजी विद्यार्थी संघाचे सचिव भैय्यासाहेब हितेंद्र गरूड यांनी दादासाहेब संजयजी गरूड यांनी दिलेल्या पाठबळावर कार्यकरीत असल्याचे सांगत महाष्ट्रभर दादांच्या कार्याचा , किर्तीचा गौरव झालेला असल्याचे ते म्हणाले .स्पर्धा परीक्षेची दर्जेदार स्वरुपाची ३० पुस्तके वाटप करण्यात आले .निकीता सपकाळ,संजय भोपे व राष्ट्रसंत परमपूज्य भय्यूजी महाराज स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अभ्यासक विद्यार्थ्यांना देण्यात आले. ज्ञान -विज्ञान -तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कृत तसेच राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार व फिरता चषक स्वर्गवासी विद्यार्थीप्रिय प्रा . यु .पी. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ . तारा पाटील मॅडम यांच्याकडून महाविद्यालयास देणगी रूपाने देण्यात आला या वर्षी चा हा पुरस्कार भरत निकम या विद्यार्थ्यांला प्राप्त झाला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डोंबिवली येथील महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ . अरुण आहिरराव, प्रा . सुनील गरुड, जनसंपर्क अधिकारी श्री .ए.ए. पटेल, जनसंपर्क अधिकारी श्री .यु. यु . पाटील, भाऊसो . प्रदिप लोढा , सौ . जयश्री ताई झंवर, डॉ . निलम अग्रवाल, मा विलास आहिरे, चरणसिंग पवार, गिरीष भाऊ कुळकर्णी, पत्रकार साळूंखे, दिगविजय सूर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले . दिग्विजय भाऊ सूर्यवंशी यांनी माजी विद्यार्थी संघास पाच हजार रु . देणगी तसेच जेष्ठ उद्योजक माजी विद्यार्थी प्रदिप जी पायघन यांनी ११००० रु देणगी दिली.
दक्षीता राठोड, शिवानी अहेर यांना गणवेश भेट देण्यात आला .डॉ . योगिता चौधरी व आनंदी मॅडम यांनी दादासाहेब संजयजी गरुड यांचा मंचावर सत्कार केला . कु . ममता कुमावत या विद्यार्थीनीने शेंदुर्णी नगरीत गरीबांना आधार देणारे दादा तुम्हीच ही वाढदिवस विशेष कविता उत्कृष्ट शैलीत सादर केली . यांचे या प्रसंगी दिपक नाईक या विद्याथ्र्याने स्पर्धा परीक्षा केंद्राचा वार्षीक अहवाल प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने सादर केला . यात अभ्यास करीत असलेले विद्यार्थी यश संपादन करीत असल्याचे त्यांनी सांगितले . तसेच स्पर्धा परीक्षा व्याख्यान मालिकेच्या मार्गदर्शक वक्त्यांचा गौरव मनोगतातून त्यांनी केला .पालकांच्या वतीने संशोधनात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कु . मनीषा चौधरी च्या आईने भावगर्भ असे मनोगत व्यक्त केले . मुख्याध्यापिका सौ .तारा पाटील यांनी संस्था व महाविद्यालया प्रती ऋण भावना व्यक्त केल्या . अंबड जि. जालना येथील रहिवाशी मा . नगरसेविका व महाविद्याच्या माजी विद्यार्थीनी योगगुरू सौ .जयश्री ताई झंवर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला . श्री . प्रदिप भाऊ लोढा यांनी दादासाहेब संजयजी गरुड यांच्या आदर्श जीवन व कार्याचा वेध घेतला . अन्नदान व शिक्षण यातून परंपरा निर्माण केल्याचे ते म्हणाले .१९९३ पासून पहूर नगरीच्या सरपंचपदाची धुरा सांभाळताना आलेल्या अनुभवांचा आढावा श्री . प्रदिप लोढा यांनी घेतला . माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष से . नि . प्रा सुनिल गरुड यांनी महाविद्यालयात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला तसेच स्व .राष्ट्रसंत परमपूज्य भय्यूजी महाराज स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या कार्याचा गौरव केला .तसेच त्यांनी युनिक अकेडमी पुणे यांच्या कडून स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली,से. नि . प्राध्यापकांच्या कार्याचा देखील त्यांनी गौरव केला . महाविद्यालयातून प्रशासकीय अधिकारी घडावेत असा संदेश त्यांनी दिला .माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक डॉ . अरुण अहिरराव यांनी उपस्थितांना आपल्या अनोख्या वक्तृत्व शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . वाढदिवस आला हो आपल्या लाडक्या अध्यक्षांचा .. या गीताचे सादरीकरण केले तेव्हा टाळ्यांच्या गजरांत सर्वांनी साथसंगत केली .. धी. शेंदुर्णी सेकं . एज्यू .सोसा चे सचिव श्री सागर मलजी जैन यांनी दादासो श्री संजय जी गरुड यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणीक कार्याचा आढावा घेतला . सत्कार मूर्ती दादासो . संजयजी गरूड यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यास मार्गदर्शन केले . माजी विद्यार्थी ग्रामीण भागातून भरारी घेत पुढे जात असल्याबाबत गौरव केला . से . नि .प्राध्यापकांच्या ज्ञानदानाचा गौरव त्यांनी केला .शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधून विद्यार्थी पुढे जात असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले . दादासो संजय जी गरुड यांनी वाढदिवसाप्रित्यर्थ शुभेच्छा देणाऱ्या मित्र परीवार व हितचिंतकांचे त्यांनी आभार व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी मनोगते व्यक्त केली .विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे अवाहन त्यांनी केले .माजी विद्यार्थी -पालक व शिक्षक मेळाव्यात बहुसंखेने उपस्थिती लाभली . महाविद्यालयात मा . प्राचार्य डॉ . वासुदेव आर . पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण केलेल्या ध्यानधारणा केंद्राचे उदघाटन व बोधीसत्व , तथागत , भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची स्थापना … ई .स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप संजय गरुड व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी प्रा एन एस सावळे, प्रा आर जी पाटील डॉ संजय भोळे, डॉ शाम साळुंखे , डॉ सुजाता पाटील, डॉ . प्रशांत देशमुख, प्राचार्य डी .आर. शिंपी .पर्यवेक्षक सुहास जैन प्रा एस जी डेहरकर, प्रा अप्पा महाजन, प्रा . अमर जावळे,प्रा वर्षा लोखंडे, प्रा . राहुल गरुड, डॉ . शरद पाटील, प्रा निलेश बारी, प्रा भूषण पाटील,डॉ वसंत पतंगे, डॉ . आर .डी. गवारे, सतिष बाविस्कर,सुधीर गरुड, संभाजी भाऊसाहेब, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन डॉ .योगिता चौधरी व डॉ . दिनेश पाटील यांनी तर आभार डॉ . प्रशांत देशमुख यांनी मानले .