गरीबांना स्वस्तधान्य मिळण्यासाठी आमरण उपोषण

0

 जळगाव | प्रतिनिधी 

स्वस्तधान्य दुकानदारांकडून वेगवेगळे कारणं देवून गरिबांना धान्य न देणार्‍यांवर कारवाई व्हावी, एकाच व्यक्तीकडे अनेक दुकानांची चौकशी करून महिला बचत गटांना किंवा विधवा व घटस्फोटीत महिलांना देण्यात यावी,यासह इतर मागण्यासाठी शांताराम बुधा अहिरे,भिमराव कडू सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.     स्वस्तधान्य दुकानदारांकडून वेगवेगळे कारणं देवून गरिबांना धान्य न देणार्‍यांवर कारवाई व्हावी, जुन्या तक्रारींची चौकशी व्हावी, एकाच व्यक्तीकडे असणार्‍या अनेक दुकानांची चौकशी करून महिला बचत गटांना, विधवा किंवा घटस्फोटीत महिलांना देण्यात यावी, शासनाची परवानगी न घेता दुकाने दुसर्‍या जागेत स्थलांतरीत करणार्‍यांचे परवाने तात्काळ रद्द् करण्यात यावे, जास्त दराने धान्य विक्री  करणार्‍या रेशन दुकानदारांचे परवाने रद्द् करावे,हप्तेखोर व गैरप्रकार करणार्‍या, दुकानदारांना, पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांना तत्काळ निलंबित करावे, नवीन रेशन कार्डासाठी दलाली बंद करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण असल्याचे दिलेल्या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.