पाचोरा (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आज ६ जानेवारी जयंतीचा दिवस ‘मराठी पत्रकारदिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने पाचोरा जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजे संभाजी युवा फाऊंडेशन अंतर्गत “आधार वड” येथे गोर गरिब नागरिकांना भोजन देण्यात आले. तसेच राजकीय, शैक्षणिक, व्यवसायिक पत्रकार बहुद्देशीय संस्था संघटना तर्फे पुण्यतिथी, पुण्यस्मरण, वाढदिवस, जयंती अशा विविध कार्यक्रमांद्वारे गोर गरिब वृध्दांना मोफत पोटभर जेवण दिले जाते.
या सुवरूपात आज आचार्य जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गणेश शिंदे यांनी जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था मार्फत गोर गरिबाला भोजनाचा आधार देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था वर्षभरात गोर गरीबांसाठी सामाजिक उपक्रम राबवत असते यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे राजे संभाजी फाऊंडेशन तर्फे आधार वडचे प्रवीण पाटील, भूषण देशमुख, राहुल पाटील, रवी देवरे, बबलू रायगडे, लक्ष्मण पाटील यांनी मेहनत घेतली तर याप्रसंगी ध्येय न्यूजचे उपसंपादक केदार पाटील, साप्ताहिक केशरीराज चे प्रतिनिधी प्रमोद पाटील, शिवसेनेचे सुधाकर महाजन, ईगल हाॅटेलचे अनिल नागरानी, अमजद खान, उदयराजे भोसले समर्थक सचिन पाटील, रवी ठाकूर, अनिल भोई, नथुराम महाजन उपस्थित होते.