गरजवंत विद्यार्थ्यांसाठी एसडी-सीडचा रविवारी शिष्यवृत्ती वितरण सोहळा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गरजवंत विद्यार्थ्यांसाठी एसडी-सीडचा  शिष्यवृत्ती वितरण सोहळा चे  रविवारी आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत  डॉ. विश्वासराव पाटील यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण उद्या रविवार सायं. ५  वाजता, ७ शिवाजी नगर जळगाव  येथे होणार आहे. वैश्विक कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सदर कार्यक्रमाचे प्रेक्षेपण झूम अपवर तसेच एसडी-सीडच्या फेसबुक आणि युट्यूब पेजवर लाईव्ह दिसणार आहे. अधिक माहितीसाठी एसडी-सीडच्या http://www.sdseed.in या वेबसाईटला  भेट द्यावी.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विश्वासराव पाटील – शहादा. हे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रेरणादायी मार्गदर्शक, यशस्वी प्रशासक, संवेदनशील समाजसुधारक असे बहुआयामी पैलू लाभलेले व्यक्तिमत्व आहेत. तसेच ते कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित धुळे येथील महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राचे कार्याध्यक्ष आहेत. मराठी हिंदी भाषेतील अनेक शोध ग्रंथ, जीवनी ग्रंथ, संपादित ग्रंथ, अनुवादित ग्रंथ अशी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे.  गांधी विचार तळागाळापर्यंत पोचविणारे ते प्रेरणादायी वक्ते व मार्गदर्शक आहेत. त्यांची काही पुस्तके महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यांच्या भरीव कार्याचा गौरव म्हणून अनेक मान सन्मान, पुरस्कार व मानाची पदे  त्यांना लाभलेली आहेत.

तरी आमंत्रित शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, साहित्यिक, विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमी मान्यवरांनी या शिष्यवृत्ती सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here